Skip to main content

ब्रिटीशांचे आगमन History notes

 युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतात आगमन

१५व्या शतकाच्या उत्तरार्धात व १६च्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात औद्योगिक क्रांती घडली. १४५३ मध्ये तुर्कीनी रोमन साम्राज्यातून कोन्स्टिटिंनोपल (इस्तंबूल) खुष्कीचा मार्ग (जमिनीवरून होणाऱ्या व्यापाराचा मार्ग जिंकून घेतला. युरोपातील औदयोगिक क्रांतीमुळे उत्पादन वाढले नव्या बाजारपेठा व कच्च्या मालाच्या शोधासाठी आशियात प्रामुख्याने भारतात समुद्रमार्गाने नवे मार्ग शोधण्याची  गरज युरोपियांना वाटू लागली. 

नवे समुद्रीमार्ग शोधणारे खलाशी
1. बार्थोल्योमु डायस (पोर्तुगाल खलाशी)
भारताकडे जाणारा नवा सागरी मार्ग शोध घेत असता दक्षिण आफ्रिकेच्या टोकाशी   जाऊन पोहचला. यालाच आशेचे भूशीर (केप ऑफ गुड होप) असे म्हणतात. 
2. कोलंबस (स्पेन खलाशी
१४९२ ला अटलांटिक ओलांडून भारताकडे जात असता पूर्व अमेरिका खंडाचा शोध लावला. 
3.वास्को द गामा (पोर्तुगिझ खलाशी) 
लिस्बन इथून १४९७ ला भारताचा शोध घेत निघाला, दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून काही काळ मोंझंबिक येथे थांबला, नंतर भारतात २३ मे १४९८ रोजी केरळच्या कालिकत बंदरावर उतरला तेथे त्याचे स्वागत झामोरिन राजाने केले. झामोरिन राजाने व्यापाराच्या सवलती दिल्या. नंतर कोचीनच्या राजानेही व्यापाराच्या सवलती दिल्या.
वास्को द गामा भारतात दुसऱ्यांदा १५०२ मध्ये परत आला. आणि कन्नोर येथे एक व्यापार केंद्र स्थापना केली.एकामागून एक, त्यांनी कॅलिकट आणि कोचीन येथे कारखाने स्थापित केले. राजा झॅमोरिन यांनी कोचीनमधील पोर्तुगीजांवर हल्ला केला, परंतु त्यांचा पराभव झाला. वास्को दा गामाचा तिसरा प्रवास 1524 मध्ये होता.तो लवकरच आजारी पडला आणि डिसेंबर 1524 मध्ये तो कोचीनमध्ये मरण पावला.
4.मेगॅलोन फर्डिनांड (स्पेन खलाशी)सागरी मार्गाने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. 

1.पोर्तुगिझ (१४९८ - १९६१)
पोर्तुगिझांचा पहिला व्हॉईसरॉय - फॅन्सीस द- अल्मेडा (१५०५-१५१०) 
भारतात पोर्तुगीजांची नौदल शक्ती विकसित करण्याचे उद्दीष्ट अल्मेडाचे होते. त्यांचे धोरण ब्लू वॉटर पॉलिसी म्हणून ओळखले जात असे.
चाळजवळील नौदलाच्या लढाईत, युद्धामध्ये मारल्या गेलेल्या अल्मेडाच्या मुलाच्या अंतर्गत पोर्तुगीजांच्या ताफ्यावर संयुक्त मुस्लिम ताफ्याने विजय मिळविला. नंतर १५०९ मध्ये दीवजवळील नौदलाच्या युद्धात अल्मेडाने संयुक्त मुस्लिम ताफ्यांचा पराभव केला, आणि  पोर्तुगीजांनी आशियातील नौदल वर्चस्वाचा दावा केला.

पोर्तुगीझ साम्राज्याचा संस्थापक - अल्फान्सो द अल्बुकर्क (१५०९ - १५१५)   मध्ये भारतात गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. १५१० मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा काबीज केला१५१५ मध्ये  पर्शियन आखातीमध्ये त्यांनी पोर्तुगीज अधिकार ओर्मूझवर स्थापित केले . कोचीन हि पोर्तुगीझ यांची पहिली राजधानी. नंतर मुख्य केंद्र गोवा केले. त्याने आपल्या सहकार्यांना भारतीय स्त्रियांची लग्न करण्याच प्रोत्साहन दिले . त्याने विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.

पोर्तुगिझांच्या सुरुवातीच्या वखारी - पश्चिमेकडे गोवा, दीव, दमण, वसई, साष्टी, चोल, मुंबई. पूर्वेकडे सॅन थोम (मद्रास), हुगळी (बंगाल). 
राजा शहाजहान चा सुभेदार कलिमखान यांच्याकडून हुगळी जिंकली. मराठे चिमाजी आप्पा यांच्याकडून वसई व साष्टी जिंकली. 
१६६१ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व कॅथरीन यांच्या लग्न संबंधामुळे पोर्तुगीझांनीं ब्रिटिशांना मुंबई आंदण म्हणून दिली, १६६8 मध्ये दुसरा चार्ल्स याने इस्ट इंडिया कंपनीला वार्षिक १० पाउंड वर दिले.
पोर्तुगीजांनी तंबाखूची लागवड भारतात आणली. पोर्तुगीज्यांच्या  कॅथोलिक धर्माच्या प्रभावामुळे भारतात कॅथोलिक धर्म पश्चिम आणि पूर्वेकडील किनारपट्टीवरील काही भागात पसरला.
पोर्तुगीजांनी गोवा येथे १556 मध्ये प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली होती. गोवा येथे एका युरोपियन लेखकाच्या भारतीय औषधी वनस्पतींवर वैज्ञानिक काम छापले गेले (1563). 
१७व्या शतकात पोर्तुगीजांची सत्ता डचांमुळे कमी होऊ लागली. १७३९ मध्ये त्यांच्याकडे फक्त 
गोवा, दीव आणि दमण होते.  
*भारतात पहिले येणारे, पहिले व्यापारी संबंध प्रस्थापित करणारे आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे - पोर्तुगीझ

2. डच (१६०२-१७९५)
हॅालंडच्या लोकांना डच म्हणतात. युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०२ ला झाली. त्यांची पहिली वखार मच्छलिपट्ट्नम (१६०५), दुसरी पुलिकत(१६१०) आणि तिसरी सुरत(१६१६). सुरुवातीला पुलिकत हे त्यांचे मुख्यालय होते. नंतर, त्यांनी 1690 मध्ये ते नागापट्टनम येथे हलविले. डच लोकांकडून व्यापार करणार्‍या सर्वात महत्वाच्या वस्तूंमध्ये रेशीम, कापूस, नील, तांदूळ आणि अफू होते. त्यांनी काळी मिरी आणि इतर मसाल्यांच्या व्यापाराची मक्तेदारी केली. पुलिकत , सूरत, चिनसुरा, कासिम बाजार, पटना, नागापट्टनम, बालासोर आणि कोचीन हे भारतातील महत्त्वाचे कारखाने होते.
डचांच्या इतर वखारी चीनसुरा(बंगाल), आग्रा (उ.प.), पाटणा (म.प.), खंभात, भडोच, अहमदाबाद, कोचीन. भारताऐवजी जावा, सुम्मण्णा, मलाया द्वीपकल्प येथे सत्ता. महत्वाचे म्हणजे त्याठिकाणच्या पोर्तुगीझ - इंग्रज सत्तांचा त्यांनी पराभव केला. 
१६३० साली पोर्तुगाल - इंग्लंड यांच्यात माद्रिदच्या तहाने त्यांच्या मैत्रीसंबंध प्रस्थापित झाले. 
१७५९ च्या बेद्राच्या लढाईत इंग्रजांनी डचांचा पराभव केला. 
१७९५ ला डचांनी भारत सोडले. 
*भारतातून जाणारे पहिले युरोपिअन म्हणजे डच*.

३.फ्रेंच (१६६४-१९५४) पण १७६३ पर्यंत साम्राज्यविस्तार 
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६६४
पहिली वखार १६६८ - सुरत. दुसरी मछलीपट्टणम (१६६९). फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच नाविकाने पूर्व किनाऱ्यावर मद्रासजवळ वलिंगडपूरम येथे व्यापारी जहाज आणले. त्यानंतर मुस्लिम सुभेदाराकडून व्यापाराची परवानगी घेतली - पॉण्डिचरी येथे. 
१६७४ साली बंगालचा मुघल सुभेदार शाहिस्तेखान याकडून वखारींची परवानगी - चंद्रनगर.
*फ्रेंचांचा दूरदृष्टीकोन असणारा गव्हर्नर म्हणजे डुप्ले.* 
*फ्रेंचांच्या भारतातील वखारी - माहे, चंद्रनगर, कारिकल, पॉण्डिचरी, याणम. (१९५४ ला पॉण्डिचरी भारतात सामील.*
१६५० ला स्पेनने पोर्तुगालचा तर १६५४ इंग्लंडने हॉलंडचा पराभव केला त्यामुळे पोर्तुगीझ व डचांच्या व्यापारावर मर्यादा आल्या. आणि फ्रेंच एकमेव इंग्रजांचे प्रतिस्पर्धी उरले. 
१७६१ च्या वॅान्दिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. 
इंग्रज व फ्रेंच यांच्यात ३ कर्नाटक युद्धे झाली - 
॰ पहिले : १७४६ - १७४८, ॰दुसरे : १७४९-१७५४,  ॰तिसरे : १७५६-१७६३.

४. इंग्रज (१६०८ - १९४७)
*१५९९ मध्ये लंडनमध्ये काही इंग्रज व्यापाऱ्यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली*.
३१ डिसेंबर १६०० साली राणी एलिझाबेथ (पहिलीकडून पूर्वेकडे आशियायी देशांशी व्यापार करण्याचा परवाना मिळाला. (१५ वर्षाकरिता).
१६०८ साली कंपनीच्या वतीने कॅप्टन हॉकिन्स हा दूत जहांगीर बादशहाच्या दरबारी आला  त्याने १६०८ साली सुरत येथे वखारीचा परवाना मिळवला.

*भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज - थॉमस स्टीव्हन्सन *

६१५ इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स याने कायमची व्यापाराची सनद दिली. त्याच्याकडून त्याचा वकील थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून भारतात अनेक ठिकाणी वखारी स्थापन करण्याची परवानगी मिळवली.
१६२३ पर्यंत इंग्रजांनी सुरतभडोचअहमदाबादआग्रामछलीपट्टणम (दक्षिणेकडील पहिली वखारवखारी स्थापल्या.

*१६३९ पूर्व किनाऱ्यावर किल्ला बांधून वखारी स्थापण्याची परवानगी मिळवली - तो किल्ला फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजे आजचे मद्रास*.

बंगाल सुभ्यातील पाटणाबालासोरडाक्का वखारी स्थापल्या.

*१६९८  हुगळी नदीकिनारी इंग्रजांनी सुतानती , कालिकत गोविंदपूर या  छोट्या गावांची जमीनदारी मिळालीवखारी  गावांच्या स्वरंक्षणासाठी किल्ला बांधला -  फोर्ट विल्यम
हा किल्ला (फोर्ट विल्यम)   गावे मिळून आजचे - कोलकाता बनले.*

*इंग्रजांनी भारतात स्थापन केलेल्या  महत्वाच्या शहरांचा क्रम*
१६३९ - मद्रास१६६१ - मुंबई१६९८ - कोलकाता.

१६८७ पर्यंत इंग्रजांचे सुरत हे मुख्य ठाणे होते पण मराठ्यांच्या स्वार्यांमुळे नंतर मुंबई हे मुख्य ठाणे केलेभारतात सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांना - पोर्तुगीझडचफ्रेंचमुघलमराठेशीख यांच्याशी संघर्ष करावा लागला

MPSC, History notes, British rule

Comments

Popular posts from this blog

पेशी : The Cell

सजीव  वस्तू लहान युनिट्सपासून बनल्या जातात ज्याला पेशी म्हणतात . पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. काही जीव एकाच पेशीपासून बनलेले असतात आणि त्यांना एकपेशीय सजीव, तर, अनेक पेशींनी बनवलेल्या बहुपेशीय सजीव म्हणतात. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. सर्व सजीवांची रचना व कार्ये हि पेशींच्या पातळीवर होत असतात.  रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने १६६५ मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सुष्मदर्शकाखाली पहिले, कप्प्यामध्ये मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे रचना दिसली, या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले. लॅटिन भाषेत (Cella)  म्हणजे लहान खोली.  एम. जे. श्लायडेन व थियोडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी १८३८ साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. - सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे .  1 885 मध्येआर. विरशॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. ॲन्टोन ल्युवेन्हॅाक यांनी 1673 मध्येविविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार ...