क्रांतियुग
अमेरीकन स्वातंत्र्ययुद्ध ः
अमेरीगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरीका खंडाचा शोध लागला. त्यानंतर युरोपमधील अनेक देशांतील लोकांनी या नव्या ठिकाणी जाऊन तेथील प्रदेश बळकावले. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. शालेय शिक्षण देणे, सार्वजनिक वाचनालये सुरु करणे, स्थानिक कर ठरवणे, व अन्य सामान्य विषयासंबंधी निर्णय घेण्याची वसाहतींना परवानगी होती, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. या वसाहतींच्या व्यापारावर इंग्लंडचे नियंत्रण होते.
अमेरिकेतील साधनसंपत्तीचा उपयोग इंग्लंडच्या फायद्यासाठी करून घेणे हा उद्धेश इंग्लंचा होता. वसाहतीतील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारण्याचा हक्क इंग्लंडचा होता. फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाच्या खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा असा हुकूम जारी करण्यात आला.
इंग्लडने वसाहतींवर लादलेली अशी बंधने वसाहतींना मंजूर नव्हती. 'इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही कर देणार नाही,' असे सांगून वसाहतींनी इंग्लंडच्या जुलुमाविरोधात चळवळ सुरु केली.
थॉमस जेफरसन :-
४ जुलै १७७६ रोजी अमेरिकन वसाहतींनी अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला.सर्व माणसे जन्मतः समान आहेत, प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे, जनता सार्वभौम आहे, असे विचार जाहीरनाम्यात मांडण्यात आले.
जॉर्ज वॉशिंग्टन:-
अमेरिकन वसाहतींचा नेता जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले, या युद्धात अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला. या वसाहतींनी एकत्र येऊन आपले 'संघराज्य' स्थापन केले. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. राजाविना राज्य चालू शकते हा नवा विचार अमेरिकेच्या स्वंत्रयुद्धाने दिला.
2. फ्रेंच राज्यक्रांती:
इ. स. १७७४ मध्ये सोळावा लुई फ्रान्सचा राजा झाला. मनाला येईप्रमाणे तो राज्यकारभार करी. लोकांना क्षुल्लक कारणांवरून तुरंगात डांबले जाई. राजा व त्याचे सरदार चैन व ऐषाराम करत. सरदार, धर्मगुरू यांना कार्टून सूट असे, कराचा सर्व बोजा सामान्य लोकांवर असे. राजाच्या विरोधात कटकारस्थान केल्याच्या संशयावरून लोकांना तुरुंगात डांबले जाई. फ्रान्सची राजधानी बॅस्टिलच्या तुरुंगात सर्वांना डांबण्यात येई.
फ्रान्समधील विचारवंत:-
सामान्य लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात फ्रान्समधील अनेक विचारवंतांनी आवाज उठवला, यामध्ये माॅंटेस्क्यू, व्हाॅल्टेअर आणि रुसो असे अनेकजण होते. त्यांच्या विचारांमुळे सामान्य लोकांना राजाच्या जुलमाविरुद्ध चळवळ करण्याची प्रेरणा मिळाली.
स्वातंत्र, समता आणि बंधुता
अन्यायाचे प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावर १४ जुलै १७८९ रोजी लोकांनी हल्ला केला. तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले. आणि राजाच्या जुलमी कारभारातून फ्रान्सची मुक्तता केली.
फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून व्यक्त झालेली स्वातंत्र, समता आणि बंधुता हि मूल्ये आधुनिक जगाच्या उभारणीला महत्वाची आहेत.
3. औद्द्योगिक क्रांती:
युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरु झालेला व्यापार अठराव्या शतकात भरभराटीला आला. व्यापारात इंग्लडने इतर युरोपीय देशांच्या मानाने खूप प्रगती केली. याच सुमारास इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचे शोध लागले.
- जाॅन के - धावत्या धोट्याचा शोध लावला. त्यामुळे कापड विणण्याचा वेग वाढला.
- आर्कराईटने सुतकाताईचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. कापड उद्योगामध्ये होणाऱ्या या यांत्रिक प्रगतीमुळे कापडाचे उत्पादन अनेक पटीने वाढले.
- जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला.
- स्टीफन्सन याने वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन तयार केले.
अशा नवीन शोधांमुळे इंग्लंडमध्ये विविध उद्योग भरभराटीला आले. मोठमोठे कारखाने स्थापन होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उत्पादन वाढले. यालाच औद्द्योगिक क्रांती म्हणतात.
युरोपातील उत्पादनवाढीमुळे युरोपीय देशांना बाजारपेढेची आवश्यकता वाटू लागली. त्यांनी आशिया, आफ्रिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
MPSC, History notes, B
Comments
Post a Comment