Skip to main content

बक्सरची लढाई (1764)

1757 मध्ये प्लासीच्या लढाईनंतर, कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये मुक्त व्यापार करण्याचा निर्विवाद अधिकार देण्यात आला. कंपनीला बंगालमध्ये 24 परगण्यांचे स्थान प्राप्त झाले. मीर जाफर (१757 ते 1760) बंगालचा नवाब थकबाकीदार झाला,  फौजेचा खर्च नवाबाने द्यावा असे ब्रिटिशांनी मीर जाफर कडे मागण्या केल्या, खजिना रिकामा असल्याने तो सैन्याचा पगार देऊ शकला नाही. तेव्हा ब्रिटिशांनी त्याला पदच्युत केले व त्याचा जावई मीर कासीम याला नवाब केले. 

मीर कासिम (१७६० - १७६३) :- 
  • मीर कासिम यांनी बर्दवान, मिदनापूर आणि चितगावच सैन्याच्या खर्चासाठी दिले. 
  • इंग्रज व मीर कासीम यांच्यात तह :- (सप्टेंबर १७६०) नवाबाने दक्षिण मोहिमेसाठी 5 लाख द्यावेत. दोघांचेही शत्रू व मित्र सारखेच राहतील. 
  • सत्तेवर येताच इंग्रजांचे सानिध्य टाळण्यासाठी आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगिर येथे हलविली. (कलकत्यापासून ३०० मैल).
  • सैन्यसंघटन युरोपियांप्रमाणे ठेवून मुंगेरला आधुनिक तोफा व बंदुका तयार करण्याचा कारखाना काढला.
  • रामनारायण (बिहारचा नायब सुभेदार) मीर कासीमची सत्ता मनात नव्हता, त्याला इंग्रजांचे समर्थन होते. त्याला मीर कासीम ने ठार केले. 
  • मीर कासीम ने कारभारातील उधळपट्टीस रोख ठेवला, भ्रष्टाचारास आळा घातला व खजिना भरून काढला. 
  • मीर कासीम ने ब्रिटिशांच्या खाजगी व्यापारावर कर लावण्याचा प्रयत्न केला, ब्रिटिशांनी नकार दिला त्यामुळे नवाबाने सर्वच देशी - परदेशी व्यापारावरील कर उठवले. 
  • नवाबाने पाटणा वखारीवर हल्ला केला, परंतु अनेक ठिकाणी नवाब पराभूत झाला. 
  • नवाब अयोध्येचा नवाब शुजा - उद- दौला कडे आश्रयास गेला. 
  • बंगालच्या नवबीवर पुन्हा मीर जाफर (१७६३ - १७६५). 
बक्सरची लढाई (1764)
  • पदच्युत नवाब मीर कासीम, अवधचा नवाब शुजा - उद- दौला व मोगल बादशहा शाह आलम II एकत्र आले. 
  • ब्रिटिश सेनानी मेजर हेक्टर मनरो ७ हजार फौजेनिशी तिघांच्या ४० हजार सैन्याचा पराभूत केले. 
  • २२ ऑक्टोबर १७६४ रोजी बक्सर येथे लढाई झाली. (पटनाच्या पश्चिमेस  130 किलोमीटर गंगा नदीच्या काठी वसलेले बिहारच्या हद्दीत एक लहान तटबंदीचे शहर).
परिणाम :-
  • ब्रिटिशांची भारतातील राजकीय प्रतिष्ठा वाढली. त्यांचा लष्करी दबदबा निर्माण झाला. 
  • बंगाल सोबत अवधचे राज्यही मिळाले. 
  • दिल्लीचा बादशहा ब्रिटिशांच्या ताब्यात. 
  • ब्रिटिशांचा अलाहाबाद पर्यंत दिल्लीचा मार्ग मोकळा झाला. 
  • यानंतर बंगालमध्ये मात्र अराजकता. 
  • मीर जाफरसच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा निजाम-उद-दौला गादीवर बसला. 
  • २० फेब्रुवारी १७६५ रोजी अलाहाबाद करारावर स्वाक्षरी केली आणि त्याद्वारे निजाम-उद-दौला नवाबाला बहुतेक सैन्य काढून टाकावे आणि कंपनीद्वारे नामित नायब सुभेदार मार्गे बंगालचा कारभार करावा लागला. 
  • रॉबर्ट क्लाइव्हने शुजा-उद-दौला आणि शाह आलम II सह दोन वेगळ्या करारांची समाप्ती केली. 
  • बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली.(1765)

Comments