सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात. आणि या कामासाठी उपयोगी पडण्याऱ्या अन्नघटकांना पोषकतत्वे म्हणतात.
पोषकतत्वे आणि अन्नपदार्थ
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषकतत्वांचे मुख्य प्रकार आहेत.
प्रथिने (Proteins)
शरीराच्या पेशींच्या आणि उतीच्या वाढ आणि दुरुस्तीसाठी ते आवश्यक आहेत. प्रथिने अमिनो आम्लापासून (Amino Acid) बनलेले असतात. अत्यावश्यक अमिनो आम्ल असे असतात जे शरीराद्वारे जैव संश्लेषित केले जाऊ शकत नाहीत आणि त्यांना आहारातून घेणे आवश्यक आहे.
नऊ अत्यावश्यक अमिनो आम्ल म्हणजे फेनिलालाइन, व्हॅलिन, थ्रोनिन, ट्रायप्टोफॅन, मेथिओनिन, ल्युसीन, आइसोल्यूसीन, लाइझिन आणि हिस्टिडाइन.
वाढीसाठी शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने - कडधान्य, दूध, दूग्धजन्य पदार्थ, तसेच मांस, अंडी अश्या अन्नपदार्थपासून मिळतात.
- दूध, अंडी, मांस आणि मासे:- हि प्रथिने उच्च जैविक मूल्याने समृद्ध आहेत. या प्रथिनांमध्ये सर्व अमिनो आम्ल योग्य प्रमाणात आहेत जे शरीरातील उतींच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहेत.
- डाळी, तेलबिया आणि शेंगदाणे:- हि प्रथिने समृद्ध आहेत परंतु मानवी शरीरावर आवश्यक सर्व अमिनो आम्ल यांच्यात योग्य प्रमाणात नाहीत.
Comments
Post a Comment