सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात. आणि या कामासाठी उपयोगी पडण्याऱ्या अन्नघटकांना पोषकतत्वे म्हणतात.
पोषकतत्वे आणि अन्नपदार्थ
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषकतत्वांचे मुख्य प्रकार आहेत.
स्निग्ध पदार्थ (Fats)
आहारातील चरबी ऊर्जा प्रदान करते. ते पेशींची संरचना राखतात आणि चयापचय कार्यामध्ये सामील असतात. आवश्यक चरबीयुक्त आम्ल (fatty Acid) शरीरात संश्लेषित केले जाऊ शकत नाहीत आणि ते आहाराद्वारे प्रदान केले जातात. ओमेगा चरबीयुक्त आम्ल (fatty Acid) मानवी पोषणास आवश्यक आहेत.
तेल, तूप, लोणी अश्या स्निग्ध पदार्थांपासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. आपण झालेल्या अन्नपदार्थापासून आपल्याला उष्णेतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठी किलोकॅलरी एक्काचा उपयोग होतो.
अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलोकॅलरी एकक वापरतात. वाढत्या वयातील मिल-मुलींना रोज साधारणपणे २००० - २५०० किलोकॅलरी ऊर्जा अन्नातून मिल्ने आवश्यक आहे.
Comments
Post a Comment