Skip to main content

पोषण व आहार - कर्बोदके (Carbohydrates)

 सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात. आणि या कामासाठी उपयोगी पडण्याऱ्या अन्नघटकांना पोषकतत्वे म्हणतात.

पोषकतत्वे आणि अन्नपदार्थ 

कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषकतत्वांचे मुख्य प्रकार आहेत. 

ऊर्जादायी पोषकतत्वे - कर्बोदके

आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. ती कर्बोदकांमुळे भागते. त्यामुळे आपल्या आहारात भात, पोळी, भाकरी, अशा पदार्थांचा समावेश असतो. म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे. 

कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनविलेले सेंद्रीय संयुगे आहेत. ग्लूकोज, सुक्रोज, लैक्टोज, स्टार्च, सेल्युलोज ही कार्बोहायड्रेट्सची उदाहरणे आहेत. कार्बोहायड्रेटचे वर्गीकरण मोनोसाकॅराइड (ग्लूकोज), डिसकॅराइड (सुक्रोज) आणि पॉलिसेकेराइड (सेल्युलोज) आहे. वर्गीकरण प्रत्येक समूहात असलेल्या साखर रेणूंच्या संख्येवर आधारित आहे.

आपण खालेल्या अन्नपदार्थ पासून आपल्याला उषण्तेच्या स्वरूपात ऊर्जा  मिळते.  उष्णता मोजण्यासाठी किलोकॅलरी एक्काचा वापर करतात. वाढत्या वयातील मुलं-मुलींना रोज साधारणपणे २००० - २५०० किलोकॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज आहे.



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र - सीमा (नैसर्गिक व राजकीय सीमा)

 महाराष्ट्राच्या सीमा  1. नैसर्गिक सीमा :-  वायव्येस - सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या  उत्तरेस - सातपुडा पर्वतरांग व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या  ईशान्येस - दरकेसा टेकड्या, गरमसूर टेकड्या व भीमसेन टेकड्या पूर्वेस - चिरोली, चिकीय टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगररांगा, सुरजगड डोंगररांग  आग्नेयेस - चिमूर व मूल टेकड्या, मुदखेड व निर्मल डोंगररांग दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी व कोकणात तेरेखोल नदी पश्चिमेस - अरबी समुद्र  2. राजकीय  सीमा :-  महाराष्ट्राला एकूण ६ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा लाभली आहे.  वायव्येस - गुजरात राज्य व दादरा नगर हवेली (के. प्र) उत्तरेस - मध्य प्रदेश पूर्वेस - छत्तीसगड  आग्नेयेस - तेलंगणा दक्षिणेस - कर्नाटक व गोवा  पश्चिमेस - अरबी समुद्र  3. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व त्यांच्याशी सलंग्न जिल्हे  वायव्येस - गुजरात - ४ जिल्हे - पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. वायव्येस - दादर नगर हवेली - १ जिल्हा - पालघर   उत्तरेस - मध...

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व तालुके

  प्रशासकीय   विभाग /  जिल्हा   तालुक्यांची   संख्या   कोकण    विभाग ४७ / ५० 1 मुंबई   शहर ० 2 मुंबई   उपनगर ३ 3 ठाणे ७ 4 पालघर ८ 5 रायगड १५ 6 रत्नागिरी ९ 7 सिंधुदुर्ग   ८ *मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे तीन तालुके फक्त शासकीय कामासाठी आहेत. (संपूर्ण नागरी) ठाणे जिल्हा - (7 तालुके ) 1. ठाणे 2. अंबरनाथ 3. भिवंडी 4. शहापूर 5. कल्याण 6. मुरबाड 7.उल्हासनगर  पालघर जिल्हा - (८ तालुके ) 1. पालघर 2. तलासरी 3. जव्हार 4. डहाणू 5. वसई 6. मोखाडा 7. वाडा 8. विक्रमगड  रायगड - (१५ तालुके) 1. अलिबाग (जिल्हा मुख्यालय) 2. पनवेल 3. कर्जत 4. उरण 5. खालापूर 6. पेण 7. पाली (सुधागड) 8. मुरुड 9. रोहा 10. मांणगाव 11. श्रीवर्धन 12. म्हसाळा 13. महाड 14. पोलादपूर 15. तळा रत्नागिरी - (९ तालुके) 1. रत्नागिरी (जिल्हा मुख्यालय) 2. मंडणगड 3. दापोली 4. खेड 5. गुहागर 6. चिपळूण 7. संगमेश्वर 8. लांजा 9. राजापूर  सिंधुदुर्ग - (८ तालुके ) 1. ओरस बुद्रुक (जिल्हा मुख्यालय) 2. देवगड 3. वैभववाडी 4. मालवण 5. ...