Skip to main content

प्लासीची लढाई (1757)

भारतातील कंपनीचे मुख्य हित प्रादेशिक आणि व्यावसायिक विस्तार होते

इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे राजकीय शक्तीची स्थापना :-

*प्लासीची लढाई (1757)*
बंगालचे नवाब अलिवर्दी खान यांचा  1756 मध्ये मृत्यू झाला आणि त्याचा नातू सिराज-उद-दौला बंगालच्या गादीवर आला.  १७१७ मध्ये मुघल बादशहा फर्रुखसियर कडून कंपनीला व्यापाराचे विशेषाधिकार मिळाले. (त्याला ब्रिटिश वैद्याने असाध्य रोगातून मुक्त केले म्हणून) यानुसार कंपनीला कोणताही कर न देता बंगालच्या सुभ्यात व्यापार (आयात -  निर्यात ) करण्याची सवलत मिळाली. कंपनीचे व्यापारी आपला खासगी व्यापार कर न भरता करू लागले. सिराज-उद -दौल्ला याने कंपनीच्या खासगी व्यापारावर कारवाई केली. नवीन नवाबांच्या दुर्बलतेचा आणि कमी लोकप्रियतेचा फायदा घेऊन इंग्रजांनी सत्ता काबीज केली. तर, कोलकाताच्या राजकीय वखाऱ्यांवर हल्ला करून सिराज-उद-दौला यांनी (ब्रिटीशांना) धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 
नवाबाचे शत्रू : - 
  • शौकतगंज (पुर्नियाचा शासक
  • घसिटी बेगम (नवाबाच्या मावशी), यांना इंग्रजांचे समर्थन होते. 
  • कृष्णवल्लभ प्रकरण :- नवाबाच्या सेवेत पैशांची अफरातफर केल्याबद्दल नवाबाने शिक्षा देण्याआधी इंग्रजांच्या आश्रयास गेला, त्याला नवाबाच्या स्वाधीन करण्याचे इंग्रजांनी नाकारले. 
वखारीभोवती तटबंदी :- 
  • युरोपात इंग्लंड -  फ्रान्स यांच्यात सप्तवार्षिक युद्ध सुरु झाले
  • कलकत्त्याच्या ब्रिटिशांना चंद्रनगरच्या फ्रेंच्यांच्या हल्ल्याचा धोखा होता, म्हणून या हल्ल्यापासून स्वरक्षणासाठी वखारींभोवती तटबंदी सुरु केली, नवाबाने या तटबंदीस हरकत घेतली.
  • नवाबाने ६० हजार फौजेनिशी कासिम्बाजार येथे त्यांचा कारखाना ताब्यात घेतला. बॅट्सला युद्दकैदी केले, वखारप्रमुख ड्रेक कलकत्त्याच्या दक्षिणेस हुगळी नदीच्या मुखाशी फुल्टा येथे आश्रय घेतला. 
  • नवाबाने १५ जून, १७५६ रोजी फोर्ट विल्ल्यम काबीज केला.  
  • 20 जून 1756 रोजी, फोर्ट विल्यमने आत्मसमर्पण केले परंतु रॉबर्ट क्लाइव्हने कलकत्ता परत मिळवले.
कलकत्त्याची अंधार कोठडी / ब्लॅक होल शोकांतिका (1756) :- 
  • कलकत्त्यातील फोर्ट विल्यम येथे एक लहान कोठडीची खोली होती, जिथे बंगालच्या नवाब सिराज-उद-दौलाच्या सैन्याने एका रात्रीसाठी 146 ब्रिटीशांना  ठेवले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी दरवाजा उघडला असता १२3 कैद्यांचा दम घुटल्याने मृत्यू झाला.
नवाबाचे विस्वासघात करणारे :-
  • माणिकचंदला ताब्यात घेऊन क्लाइव्हने कलकत्ता घेतले. 
  • मीर जाफर (१७५७-१७६०) फितूर नवाब पदासाठी. (अली वर्दीच्या बहिणीशी लग्न झाले होते).
  • अमिनचंद - धनाढ्य व्यापारी. 
  • जगत शेठ - बंगालचा सर्वात मोठा पेढावाला. 
  • खादिम खान -  नवाबाच्या बडा लष्करी अधिकारी. 
अलीनगरचा तह :- 
  • ब्रिटिशांनी कलकत्ता काबीज केल्यानंतर नवाबाने हा करार केला. 9 फेब्रुवारी 1757 रोजी अलीनगर करारावर स्वाक्षरी झाली, जिथे सिराज-उद-दौला यांनी त्याचे सर्व दावे प्रत्यक्ष व्यवहारात मान्य केले. 
  • ब्रिटिशांना त्यांच्या जप्त केलेल्या वखारी परत मिळाल्या मालाची नुकसानभरपाई पूर्वीच्या सर्व सवलती दिल्या.
  • फोर्ट विल्यम (कलकत्त्यास ) तटबंदी करण्याची परवानगी मिळाली. 
  • मीर - जाफर व ब्रिटिश यांच्यात गुप्त करार - मध्यस्थी - अमिनचंद. 
  • मीर - जाफरला इंग्रजांनी नवाब बनवावे. या बदल्यात आक्रमणात्मक व स्वरंक्षक करार. 
त्यानंतर ब्रिटीशांनी  1757 च्या मार्च रोजी चंद्रनगर या फ्रेंच वस्तीवर कब्जा केला. 
प्लासीची लढाई (1757) :- 
  • इंग्रजांचे सैन्य :- रॉबर्ट क्लाइव्ह - ९०० गोरे शिपाई , १२० हिंदी शिपाई व ८ तोफा. 
  • सिराज-उद-दौला सैन्य :- ५० हजार पायदळ, १८ हजार घोडदळ, ५० तोफा. 
  • सिराज-उद-दौला मुर्शिदाबाद या राजधानीतून निघाला. प्लासी या गावाजवळ दोन्ही सैन्य एकत्र. 
  • मीर - जाफर व रायदुर्लभ या सेनापतींनीं लढाईतून आपले अंग काढून घेतले. 
  • ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचे नवाब आणि त्याचे फ्रेंच मित्र यांच्यात प्लासीची लढाई झाली. 23 जून 1757. 
  • रॉबर्ट क्लाइव्हच्या अधीन असलेल्या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपॅन्सी सैन्याने सिराज-उद-दौलाच्या सैन्यांचा पराभव केला. सिराज-उद-दौला मारला गेला. 
  • मीर - जाफर बंगालचा नवाब. 
प्लासीच्या लढाईचा परिणाम :- 
  • प्लासीची लढाई राजकीयदृष्ट्या महत्वाची. 
  • ब्रिटिशांच्या भावी साम्राज्याचा पाया घातला. 
  • बंगाल भारतातील संपन्न व मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या प्रभावाखाली. 
  • बंगालचा नवाब ब्रिटिशांच्या हातातील बाहुले बनला. 
  • ब्रिटिशांना प्रचंड संपत्तीची प्राप्त - १ कोटी ७७ लाख नव्या नावाबाकडून नुकसानभरपाई मिळाली, कंपनीस कलकत्याजवळ २४ परगण्याची जहांगिरी, तसेच क्लाइव्हला २० लाख व वॅटसन ला १० लाख मिळाले. 
  • नवाबाच्या स्वरक्षणासाठी ५०० ची फौज. 
  • व्यापारी कंपनीचे रूपांतर राजकीय सत्तेत झाले. 
  • बंगालचा खजिना रिकामा झाल्यावर नवाबी दुबळी झाली. 
  • ब्रिटिशाना बंगालमध्ये व्यापारासाठी मुक्तद्वार मिळाले, त्यांचा खाजगी व्यापार भरभराटीस आला.  
रॉबर्ट क्लाइव्ह :- 
बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून १७५८ ला नियुक्त . मुंबई व मद्रास प्रेसिडेंसिचा खर्च बंगालमधून करावा. निर्यातीकरिता कंपनी जो खर्च करेल तोसुद्धा बंगालमधून करावा. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती कंपनीला मिळाल्या. १७६० ला क्लाइव्ह इंग्लंडला परत गेला. 

बंगालच्या विजयानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा नियम प्रभावी ठरला. 

Comments